अजून एक हुलकावणी...अविस्मरणीय दिवस.. अविस्मरणीय कसला !! काळा दिवस..पण डोळे उघडणारा..
अरे तूम्ही दाखवू नका आपुलकी...नका करू प्रेम
देऊ नका मरताना मांडी
मेल्यावर खांदा
काहीच अपेक्षा नाहीय माझी तुमच्याकडून.. उरली नाहीय कुठलीही
इच्छा..
जमलं तर इतकंच करा
निदान अविश्वास तरी दाखवू नका
वेदना नव्हत्या माझ्या कधी रचलेल्या
आणि खोट्या
इतकंच समजून घ्या.... अविश्वासाचे विशेषज्ञ बनण्याआधी....
तुमच्या त्या भावना तुमच्या त्या वेदना.. आणि इतर सगळे निर्जीव
दगड..
तेल लावत गेली दुनिया आणि खड्ड्यात गेली लोकं तुम्हाला काय त्याचं...
मुखवटे घालू वावरा आणि जगा लेको तुम्ही निर्विकारपणे...
एकजात सगळे ढोंगी, स्वार्थी, नाटकी आणि दुटप्पी...तुमचं आयुष्य तुम्हालाच लखलाभ....
आता यापुढे कधीच आपलं नशीब, दैव, दुर्भाग्य असलं काही म्हणणार नाही.
जे मिळालं नाही ते आपलं नव्हतंच, असा डायलॉगही मारणार
नाही.
जे होतं ते भल्यासाठी आणि जे होत नाही तेही भल्यासाठी... असला
भिकारी खणखणाटही नकोच.
पण अपेक्षाभंगाचं वाईट वाटतंच. ते नाकबुल कशाला करा ?
बारक्या काडीवरती दिवास्वप्नांच्या माड्या बांधणं मात्र आता
बंदच केलं पाहिजे.. कायमचंच, हे बरीक खरं...
अशावेळी भान, शुध्द हरपे पर्यंत.. जाणीवा, संवेदना नष्ट होई पर्यंत ढोसावी.. मूडद्यासारखं आडवं व्हावं..
आणि शुद्धीवर आल्यावर पाय दुखेस्तोवर वणवण चालून यावं, आता हाच एकमेव उपाय....
चले चलो.............
जीने कि आरजू में मरे जा राहे है लोग...
और मरने कि आरजू में जिया जा रहा हू मै....
अलविदा दोस्तो.. फिर कभी नही मिलेंगे....
No comments:
Post a Comment